Chavdar Tale Satyagraha 100 Years : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व संग्रहालयासाठी सुनील तटकरे यांचा प्रस्ताव
फोटो Meta AI वर तयार केलेला आहे
Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे केलेल्या Mahad Chavdar Tale Satyagraha ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे Nationalist Congress Party MP Sunil Tatkare यांनी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे National Memorial and Museum 'राष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय' उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Union Home Minister Amit Shah यांच्याकडे सादर केला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर भेटीचा फोटो शेअर केला आहे.
काय म्हणतायेत सुनील तटकरे
आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांची भेट घेतली. यावेळी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे २० मार्च १९२७ रोजी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाला २०२७ साली शंभर वर्ष पूर्ण होत आहे. ‘चवदार तळे सत्याग्रह’ शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व संग्रहालय उभारण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव गृहमंत्री अमितजी शाह यांच्याकडे सादर केला.
महाडचा सत्याग्रह हा देशाच्या नैतिक, सामाजिक व घटनात्मक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी केलेला ‘चवदार तळे सत्याग्रह’ हा समता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या लढ्याचे एक ऐतिहासिक प्रतीक आहे. शताब्दी वर्षानिमित्त महाडच्या या ऐतिहासिक वारसा स्थळाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देण्याबाबत गृहमंत्री अमितजी शाह यांच्याशी सकारात्मक व सखोल चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान २०२७ सालच्या ‘चवदार तळे सत्याग्रह’ शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व संग्रहालय हे प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर अभिमानास्पद बाब ठरेल. त्यामुळे अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटकांसाठी ‘चवदार तळे’ हे ऐतिहासिक प्रेरणास्थान बनेल. तसेच एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाड व रायगड या दोन्ही ऐतिहासिक वारशांचे एकत्रीकरण केल्यास स्थानिक पर्यटन व उपजीविकेला मोठी चालना मिळेल. त्यादृष्टीने या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती गृहमंत्र्यांकडे केली.
दरम्यान या प्रस्तावावर केलेलं संसदेतील भाषणाचाही व्हिडिओ शेअर केला आहे.