नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी माकपाचा मोर्चा

Update: 2022-06-10 09:40 GMT

भारतीय जनता पार्टीचे निलंबित प्रवक्ते नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल होते. यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या दोघांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकपाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध व्यक्त केला.

Full View
Tags:    

Similar News