मुंबईत कुठे सुरू आहे लसीकरण?

Update: 2021-05-01 08:29 GMT

मुंबई – 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आजपासून सुरू करण्यात आले आहे. पण अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणात व्यत्यय येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला लसींचा मोजकाच साठा उपलबध झाला आहे. त्यामुळे १ मे रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.

भविष्यात लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्यानुसार पुढचे निर्णय घेतले जातील. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक त्या नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेने केल आहे...

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर

Tags:    

Similar News