मोठी बातमी : Covaxinला WHOची मंजुरी

Update: 2021-11-03 13:21 GMT

Covaxin लस घेतलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासादायक बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने Covaxinच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी दिली आहे. गेल्या अनेक WHO च्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या Covaxin लसीला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO ) ने आपातकालीन वापराची मान्यता दिली आहे.

Covaxin ला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्याने ही लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मर्यादा येत होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर Covaxinचा वापर होण्यासाठी या लसीला WHOची मान्यता गरजेची होती. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं Bharat Biotech कडून या Covaxin बाबत अतिरिक्त माहितीची विचारणा केली होती.

Bharat Biotech ने ही माहिती दिल्यानंतर WHO ने ती तपासून पाहिली आणि खातरजमा केल्यानंतर लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. WHO दिलेल्या माहितीनुसार संघटनेने जगभरातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या तांत्रिक सल्लागार गटाची स्थापना केली होती. या गटाने Covaxinची अभ्यास करुन ही लस जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व निकषांमध्ये बसत असल्याचा आणि कोरोनाचा प्रतिबंध करण्यात यशस्वी ठरल्याचा अहवाल दिल्याची माहिती WHOने दिली आहे.

Tags:    

Similar News