"कोर्ट" मधील विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन
"कोर्ट" मधील विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन court actor veera sathidar dies cause of corona
कोर्ट या आतंरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटातील अभिनेते विरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले.
शाहीर गीतकार कार्यकर्ता पत्रकार म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. वर्धा जिल्ह्यात जन्मलेल्या विरा साथीदार नागपूर येथील जोगिनगर येथे वाढले. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा होता. रिपब्लिकन पँथर्स या संघटनेच्या माध्यमातून ते कामगार जातीय शोषित वंचित लोकांसाठी काम करत होते. त्यांनी लिहिलेले 'उन्हा पावसात राबे माझी सावळी मंजुळा' हे गाणे प्रसिद्ध आहे.
विरा साथीदार यांच्या निधनाने डाव्या तसेच आंबेडकरी चळवळीत एक पोकळी निर्माण झाली आहे.