छगन भुजबळ दिल्लीला जाणार ; मुकुल रोहतगी आणि खासदार विल्सन यांची भेट घेण्याची शक्यता

Update: 2021-12-08 11:12 GMT

मुंबई  : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला होता. पण या अध्यादेशाला 6 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. दरम्यान राज्याचे मंत्री तसेच ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ दिल्लीला जाणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत 13 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पू्र्वी राज्य सरकारला कोर्टात अध्यादेशाचे स्पष्टीकरण द्यायचे आहे.

यासाठी मंत्री छगन भुजबळ हे दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते जेष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि डीएमकेचे खासदार आणि आरक्षण अभ्यासक विल्सन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मिळालेल्या स्थगितीमुळे राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी याबाबत कायमस्वरूपी तोडगा सरकारला काढावा लागणार आहे. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

Tags:    

Similar News