प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Update: 2019-04-05 09:00 GMT

निवडणुकीच्या काळात नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या नेत्यांवर आरोप न करता डायरेक्ट भारतात निवडणूका घेणाऱ्या निवडणूक आयोगावरच निशाणा साधला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून लढत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती.

‘निवडणूक आयोग म्हणतो पुलवामा घटनेवर तुम्ही बोलायचे नाही. आम्ही बोलू, कारण संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे.’ ‘निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर यांना तुरुंगात टाकू’

असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर यांच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काय आहे गुन्हाचे स्वरुप:

आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा आधार घेत त्यांच्या विरोधात धमकी देणे, दहशत दाखविणे या गुन्ह्य़ासाठी फौजदारी दंडसंहितेच्या कलम ५०३, ५०६ नुसार आणि १८९ नुसार ही कारवाई केली आहे.

Similar News