माझा गळा कापला तरी मी संघ (RSS) कार्यालयात जाणार नाही..

Update: 2023-01-18 06:48 GMT

पंजाबमधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजप खासदार आणि त्यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या याच वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत वरुण गांधी यात्रेत सहभागी होणार का? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, जर ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यांच्या विचारसरणीशी माझी विचारधारा जुळत नाहीत. मी संघाच्या कार्यालयात कधीही जाऊ शकत नाही. माझा गळा कापला तरी संघ कार्यालयात जाणार नाही असं म्हणत त्यांनी माझी व वरून गांधी यांची विचारधारा असामान्य असल्याचं म्हंटले आहे.

यापुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी वरुणला प्रेमाने भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण त्याची विचारधारा मला मान्य नाही. माझा लढा विचारधारेचा आहे. वरुण जवळपास दोन वर्षांपासून आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी मिळावी यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिला होता.

तसेच केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित विभागांमध्ये एक कोटी पदे रिक्त असल्याचे सांगितले होते. असं राहुल गांधी म्हणाले. मागच्या काही दिवसांपासून वरून गांधी आपल्याच पक्षातील पक्षश्रेष्टींवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते आता भारत जोडो यात्रेत सगभागी होणार का? असं देखील म्हंटल जात होतं. यावरच बोलताना राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News