ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा : सचिन सावंत

ब्रुक फार्मा कंपनी व भाजपा नेत्यांचे रेमडेसीवीरच्या काळ्याबाजारीत संगनमत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Update: 2021-04-20 13:25 GMT

रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीय करत आहेत. राज्य सरकारलाही या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नसताना ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खाजगीरित्या कशी वाटली? भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, दमण प्रशासनाने ब्रूक फार्मा कंपनीला महाराष्ट्रात त्यांचे रेमडेसीवीर वितरण करण्यास परवानगी दिली नाही असे कंपनीच म्हणते तर मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी हे प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होते. सदर रेमडेसीवीर इंजेक्शन निर्यातीकरता होते तसेच त्याची वितरणाकरता एफडीएची परवानगी नव्हती आणि रेमडेसीवीरसारखे नोंदणीकृत औषध असे विकले जाणे व लोकांकडून अनधिकृतपणे पैसे घेणे हे भयानक आहे. मुंबईतील रेमडेसीवीरच्या अवैध साठ्याप्रकरणी डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती आणि दोन्ही विरोधी पक्ष नेते फडणवीस व दरेकर यांनी केलेली नौटकी उघड झाली आहे, असे म्हणत लवकरच यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करु असेही सावंत म्हणाले.

Full View

Tags:    

Similar News