शिवसेना शपथविधी विरोधात सर्वोच्च न्यायालयात

Update: 2019-11-23 16:24 GMT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या संदर्भात कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात कर्नाटक प्रमाणे तात्काळ सुनवाई करावी. अशी विनंती केली आहे. जर सुनवाई उशिरा झाली तर आमदार खरेदी केले जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा

कुठे बिघडलं गणित?

2014 ला भाजपाला पाठींबा देणं ही ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद

काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ही लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचं सकाळीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळं या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालय यावर कधी सुनावणी घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान अजित पवार यांनी पक्षाला विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटर हेडवरील एक पत्र राज्यपालांना दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या एकूण 54 आमदारांच्या सह्या आहेत. त्यानंतरच राज्यपालांनी दोनही नेत्यांना शपथ दिली. मात्र, आमदारांचं हे पत्र भाजपसाठी नव्हतं तर आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं पत्र होतं. त्यामुळं फडणवीस यांना सत्तास्थापने साठी दिलेलं पत्र कितपत ग्राह्य धरलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Similar News