‘काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या सोडाच एक गोळीही चालवली नाही’- अमित शाह

Update: 2019-10-10 08:26 GMT

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी “महाराष्ट्रात निवडणुकांचा शंखनाद झाला असुन एका बाजुला भाजप- शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुक लढवत आहेत तर, दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे घराणेशाही असलेले पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.” असं सांगली येथील प्रचारसभेत म्हटलं आहे.

गृहमंत्री शाह यांनी सभेत ‘कलम ३७०’ विषयी भाष्य करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम रद्द करुन संपुर्ण देशातुन दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण समाप्त करुन देशाला अखंड करण्याचं महान कार्य केलं असुन सरदार पटेल यांचं स्वप्न पुर्ण केलं असल्याची भावना व्यक्त केली आहे.

https://youtu.be/DMneiWgatNQ

“कांग्रेस आणि राष्ट्रवादीने ‘कलम ३७०’ हटवण्यास विरोध केला आणि असही म्हटलं होतं की कश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. ५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘कलम ३७० रद्द केलं होतं आणि ५ ऑक्टोबर ही उलटुन गेला आहे. रक्ताच्या नद्या सोडाच एक गोळीही चालवली नाही” असा टोला अमित शाह यांनी विरोधकांना लगावला आहे.

Similar News