अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्यासह सोनी नेटवर्कच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Update: 2020-11-03 11:04 GMT

सोनी टीव्ही वरील कार्यक्रमात 'कौन बनेगा करोडपती' मधील स्पर्धकांना अभिताभ बच्चन प्रश्न विचारत असतात. कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अभिमन्यू पवार यांनी आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्यांनी हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याचा आरोप बच्चन यांच्यावर केला आहे.


हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. पण प्सुडोसेक्युलॅरिझम चे ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावनादुखावत असतात.कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. लातूर पोलिस अधीक्षक यांच्याकडे मी लिखित तक्रार नोंदवली आहे.हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलिस गुन्हा नोंदवू शकतात. लवकरच एफआरआय नोंदवला जाईल. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Tags:    

Similar News