युवा स्वाभिमानच्या गोंधळानंतर भाजपचे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन

युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मनपामध्ये गोंधळ घातल्याने भाजपने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करत घटनेचा निषेध केला.

Update: 2021-08-18 10:59 GMT

अमरावती : काल अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला, अमरावती महानगरपालिकेकडून कुशल व अकुशल कामगारांसाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. परंतु या कंपनीकडून प्रत्येक मजुराला पंचवीस हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते सभागृहात घुसले व गोंधळ घातला.

दरम्यान या गोंधळानंतर आज महानगरपालिकेच्या सदस्यांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळाजवळ आंदोलन केले. हा सगळा प्रकार घटनाबाह्य आहे आम्ही या गोंधळाचा निषेध करतो शहरामध्ये अशी दादागिरी चालू देणार नाही काल जो प्रकार घडला तो संविधानाच्या विरोधात होता अशी प्रतिक्रिया चेतन गावंडे महापौर यांनी दिली. तर भाजपचे शहराध्यक्ष पातूरकर यांनी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करत घटनेचा निषेध केला.

Tags:    

Similar News