जळगावमध्ये सेना भाजप युती धोक्यात, गिरिश महाजन समर्थकांची बंडखोरी

Update: 2019-10-15 09:24 GMT

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मधून भाजपने बंडखोर उमेदवार उभा केल्यानं जळगाव ग्रामीणमध्ये सेना-भाजप युती धोक्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप शिवसेना युती वादात सापडली आहे.

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे ९९ टक्के भाजप आपल्याबरोबर असून गुलाबराव पाटील यांचा पराभव करू. भाजपचे बुथ प्रमुख ते भाजप पक्षाची आपल्याला उघडउघड मदत आहे अशी खळबळजनक माहिती गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध असलेल्या भाजप बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी 'मॅक्समहाराष्ट्र'शी बोलताना दिली आहे.

याच जागेवरून मोदींच्या सभेआधीच गुलाबराव पाटील आणि चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात वादावादी झाली होती. सध्या बंडखोर उमेदवार उत्तरदे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपचं प्रचार साहीत्य उघडपणे वापरत आहेत. त्यामूळं भाजप-सेनेत वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांना हरवण्यासाठीच आपण बंडखोरी केल्याचं उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे म्हणताहेत, काय म्हणाले भाजपचे बंडखोर तुम्हीच पाहा :

 

Full View

Similar News