अजित पवार शरद पवारांच्या घरी; पवार कुटुंबियांची बैठक

Update: 2019-09-28 07:32 GMT

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला आले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत बंधू श्रीनिवास पवार, मुलगा पार्थ पवार आणि धनंजय मुंडे हे पोहोचले आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काही वेळापूर्वी फोनवरून बोलणं झालं होतं. शरद पवार पुण्याहून मुंबईला निघाल्यापापासून अजित पवार हे मुंबईतच असल्याचं बोललं जात होतं. आता शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक पार पडणार आहे. सुप्रिया सुळेही इथे उपस्थित आहेत.

या संपूर्ण परिसरापासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवलं जातंय. मात्र, थोड्याच वेळात ते माध्यामांना संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Similar News