राज्यात एका दिवसात 10 हजार 14 रुग्ण कोरोनामुक्त

Update: 2020-08-12 01:47 GMT

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी राज्यात १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे.

तर एका दिवसात राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर राज्यात मंगळवारी २५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे.

हे ही वाचा...

संजय दत्तला कॅन्सर…

“ऐ मौत तूने मुझे ज़मीदार कर दिया”, राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंचा उल्लेख

सध्या राज्यात १० लाख ०४ हजार २३३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले असून ही संख्या 927 एवढी आहे. तर एका दिवसात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुंबई 917 रुग्ण आढळले असून एका दिवसात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Similar News