“ऐ मौत तूने मुझे ज़मीदार कर दिया”, राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन

88

आपल्य़ा उर्दू गझल आणि शायरीने कोट्यवधी तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले ज्येष्ठ शायर राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. राहत इंदोरी यांच्या निधनाने उर्दू शायरीच्या जगतात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राहत इंदोरी यांनी बुधवारी स्वत: ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती.

तसंच आपण इंदोरमधील अरबिंदो हॉस्पिटलमध्ये एडमिट असून लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करा असे आवाहनही केले होते. त्याचबरोबर आपल्या मिश्किल शैलीत त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माझ्या कुटुंबियांना फोन करुन त्रास देऊ नका मी ट्विटर आणि फेसबुवक अपडेट टाकत राहीन असेही म्हटले होते.

राहत इंदोरी यांचीच एक कविता

कश्ती तेरा नसीब चमकदार कर दिया
कश्ती तेरा नसीब चमकदार कर दिया
इस पार के थपेड़ों ने उस पार कर दिया

अफवाह थी की मेरी तबियत ख़राब हैं
लोगो ने पूछ पूछ के बीमार कर दिया

रातों को चांदनी के भरोसें ना छोड़ना
सूरज ने जुगनुओं को ख़बरदार कर दिया

रुक रुक के लोग देख रहे है मेरी तरफ
तुमने ज़रा सी बात को अखबार कर दिया

इस बार एक और भी दीवार गिर गयी
बारिश ने मेरे घर को हवादार कर दिया

बोल था सच तो ज़हर पिलाया गया मुझे
अच्छाइयों ने मुझे गुनहगार कर दिया

दो गज सही ये मेरी मिलकियत तो हैं
ऐ मौत तूने मुझे ज़मीदार कर दिया

 

 

Comments