संजय दत्तला कॅन्सर…

18

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या अभिनेता संजय दत्त ला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. संजय दत्त रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची कोरोना ची चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी निगेटिव्ह आली.

चित्रपट अभ्यासक संजय नहाटा यांनी या संदर्भात Tweet करुन माहिती दिली आहे.

संजय दत्त ने आपण कामापासून काही दिवस ब्रेक घेणार आहोत. असं ट्विट केलं होतं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं.

माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत आणि काही वैद्यकीय उपचारांसाठी मी ब्रेक घेतोय,

असं संजयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं…

Comments