धुळ्यात कोरोनाचे १५ रुग्ण फरार

Update: 2020-07-06 01:53 GMT

खान्देशात धुळे आणि जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. धुळे जिल्ह्यातील नगावबारी येथील बाफना हॉस्पिटल या कोविड केअर सेंटरमधून पंधरा रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.

त्यात मुकटी व हेंकळवाडीतील रुग्णांचा समावेश आहे. याबाबत कोविड केअर सेंटरच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार दिली आहे. धुळे जिल्ह्यात बाधीत रुग्णसंख्या हजारावर पोहचली आहे तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा..

पोलीसांच्या बदल्या रद्द! सरकारमध्ये काय चाल्लंय काय? रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण

Fact Check: पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला तो हॉल सेमिनार रूम की हॉस्पिटल वॉर्ड?

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक 254 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे आता पर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४४३० वर पोहचली आहे. यापैकी 2611 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 271 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा फैलाव सर्वाधिक जळगाव , भुसावळ , अमळनेर या शहरांमध्ये असल्याने साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तिन्ही ठिकाणी 7 जुलै ते 13 जुलै या दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. यात मेडिकल, दूध ,।कृषीकेंद्र याच सेवा फक्त चालू राहणार आहेत.

Similar News