राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार कोटी वर्ग: दादा भुसे

Update: 2020-06-23 10:07 GMT

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी कधी होणार? तसंच कर्जमाफी च्या निकषात बसुनही कर्जमाफी न झाल्यानं अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

त्यातच आज बीड येथे बोलताना कृषी मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी राज्यात कर्जमाफीची योजना पारदर्शक राबवली गेली असल्याची माहिती दिली. आत्तापर्यंत 19 लाख शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून आणखी 8 हजार कोटी कोरोना संसर्ग संपुष्टात आल्यावर देण्यात येणार आहेत. अशी माहिती दिली. ते आज बीड येथे माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा

भारत चीन संघर्ष: कमांडर पातळीवरील चर्चेत झाला महत्त्वाचा निर्णय

Covid19: पत्रकारिता म्हणजे काय रे भाऊ?

…तर ते सरकार टिकलं असतं: देवेंद्र फडणवीस

तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा आदेश बॅकांना दिला आहे. एखादा महिना पुढे झाला तर त्याच्या व्याजासह सरकार पैसे देणार आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेने काळजी करण्याचं काम नाही. यावेळी बीड जिल्ह्याच्या पेरणीची त्यांनी आढावा घेतला असता, जिल्ह्यात 70 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती दिली. माञ, पेरलेलं सोयाबीन उगवल्या नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यासाठी समितीचे गठन केले असून ही समिती लवकरच आपला अहवाल देईल अशी माहिती समितीने दिली आहे.

Similar News