प्रज्ञासिंहचा 'शाप' - द निखिल वागळे शो

Update: 2019-04-24 17:54 GMT

मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे व त्यांचे सहकारी अशोक कामटे व विजय साळस्कर शहीद झाले होते. शहीद हेमंत करकरे यांच्याकडे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास असताना त्यांनी प्रज्ञासिंह यांना अटक केली होती. त्या या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. एका बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वींना भाजपने भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्यंतरी त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, हे वक्तव्य जाणीव पुर्वक केले होते का? एका शहीदाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वक्तव्याबाबत कोणती भूमिका घेतली? भाजप पुन्हा एकदा हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे का? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रज्ञासिंह नक्की कोण आहे? काय आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य... पाहा ज्येष्ठ संपादक निखिल वागळे यांचे सडेतोड विश्लेषण

Full View

Similar News