पवार ॲट वॉर! : हेमंत देसाई

Update: 2020-07-01 16:41 GMT

सध्या भारत आणि चीन या देशादरम्यान गलवान खोऱ्यात तणावाचं वातावरण आहे. या ठिकाणी झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहिद झाले आहेत. त्यामुळं दोन देशातील सबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहेच. त्याचबरोबर देशात राजकीय वातावरण तापलं आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात वारंवार ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भारताला चीनसमोर कणखर भूमिका घ्यायला हवी ती घेता आली नाही. अशी टीका करत चीन ने आपल्या देशाचा भूभाग ताब्यात घेतला असल्याचा आरोप राहुल यांनी मोदींवर केला होता.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर शरद पवार यांनी कॉंग्रेसला 1962 च्या युद्धाची आठवण करुन दिली.

"काही भाग चीनने बळकावला हे खरं आहे. चीनच्या युद्धानंतर 45 हजार स्क्वेअर किलोमीटरचा आपला भूभाग चीनने ताब्यात घेतला आहे, तो आज घेतलेला नाही. पण आपण आरोप करतो त्यावेळी पूर्वीच्या काळी काय घडलं, हे माहीत असायला हवं. या गोष्टीचं राजकारण होऊ नये, कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न असून हा प्रश्‍न राजकारणाच्या पुढचा आहे,"

असं म्हणत कॉंग्रेस चे मित्र पक्ष असलेल्या पवारांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर बाळासाहेब थोरात, नितिन राऊत यांनी शरद पवारांच्या विधानाबाबत भाष्य देखील केलं. त्यामुळं शरद पवार भाजपच्या जवळ जात आहेत का? शरद पवारांच्या विधानामुळ महाविकास आघाडीत फुट पडली आहे का? पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जात आहे. अशा चर्चा सध्या सुरु आहे. या सर्व चर्चा आणि पवारांची भूमिका या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलेलं विश्लेषण

Full View

Similar News