COVID 19 : आर्थिक अरिष्टाला तोंड देण्यासाठी मोदी सरकारकडे रोड मॅप आहे का? - कुमार केतकर

Update: 2020-04-19 16:15 GMT

आत्तापर्यंत जगावर अनेक वेळा संकट आली. पहिलं महायुद्ध असो की दुसरं महायुद्ध किंवा 1929-30 ला आलेली आर्थिक मंदी असो किंवा 2008 साली आलेली जागतिक मंदी असो. ही सर्व संकट मानवी चुकांमुळं आलेली आर्थिक संकट आहे. मात्र, कोरोना व्हायरस हे निसर्ग निर्मित संकट आहे. हे एक जागतिक अरिष्ट आहे. त्यामुळं याचा सर्व जागावर परिणाम होणार आहे.

जग संकटातून हळहळू सावरेल देखील मात्र, याचा परिणाम काही वर्ष प्रत्येक देशात कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संदर्भात जेष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी कोरोना व्हायरस आणि अर्थसंकट या विषयी बोलताना देशाला जर या आर्थिक संकटातून बाहेर काढायचं असेल तर योग्य रोडमॅप गरजेचा आहे. असं सांगितलं आहे.

या रोडमॅपमध्ये प्रत्येक राज्याचं अस्तित्व वेगळं असणार आहे. कारण प्रत्येक राज्याच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळं केंद्रानं प्रत्येक राज्याला बाहेर निघण्यासाठी आर्थिक मदतीबरोबरच उपाययोजना राबवण्यासाठी मदत करणं गरजेचं असल्याचं मत केतकर यांनी व्यक्त केलं आहे.

Similar News