राज्यात भाजप आक्रमक, “माझे अंगण, माझे रणांगण”

Update: 2020-05-22 08:14 GMT

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. माझे अंगण, माझे रणांगण असे नाव या आंदोलनाला देण्यात आले आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अंगणात येऊन काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात निदर्शनं करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान शिवसेना या आंदोलनाला उत्तर देणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. पण शिवसेनेने ट्विट करत राज्यात गंभीर परिस्थितीत असताना आंदोलन करणे चुकीचे असल्याची टीका केली आहे.

एकनाथ खडसे आंदोलनात सहभागी होणार?

दरम्यान भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे या आंदोलनात सहभागी होतील का अशी चर्चा असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र खडसे हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत, असा दावा केला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे.

Full View

 

Similar News