घुसखोरी झालीच नाही, तर माघार कशी?: ब्रिगेडिअर सुधीर सावंत

Update: 2020-07-06 12:43 GMT

आज गलवान खोऱ्यामधून चीनने आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सोमवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी रविवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली या चर्चेनंतर चीनने माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नसल्याचं म्हटलं होतं? त्यामुळं चीनने माघार घेतली असं म्हणता येईल का? असा सवाल ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी उपस्थित केला आहे. आज त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दोनही देशाला युद्ध परवडणार नाही. असं म्हणत दोन्ही देशांमधील सकारात्मक पावलं उचलायला हवी असा आशावाद व्यक्त केला आहे.

Full View

Similar News