ICMR चा इशारा, सरकार गांभीर्याने घेईल का? : कुमार केतकर

Update: 2020-04-25 05:41 GMT

येत्या ४ मे ला जर देशातला लॉकडाऊन उठवला तर मोठ्याप्रमाणावर करोना विषाणूचा प्रार्दुभाव होईल आणि असं झाल्यास आपल्याकडे तशी वैद्यकिय सुविधा देखील नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल. तसेच लॉकडाऊन जाहीर करण्याआधी विशेष सल्लागारांशी चर्चा न करताच पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला.

आणि १४ कोटी स्थलांतरित लोकांची हाल, अन्नपुरवठा, उद्योगधंदे आणि वाहतूकीचे कुठलेच नियोजन न केल्यामुळे अनेक समस्यांना जनतेला सामोरं जावं लागत आहे. ICMRनुसार करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय किंवा उत्तर नाही. ICMRने करोना विषाणू प्रतिबंधात्मक संदर्भात आपण काय केलं पाहिजे याचा अहवाल प्रसिद्ध केला होता.

आर्टिकल १४ नावाच्या जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला होता. दुर्देवाने आपल्या प्रसारमाध्यमांनी हा रिपोर्ट दाखवणं गरजेच नाही समजलं. ICMRच्या तज्ञांनुसार पुढी १५-२०० दिवस करोनाचा प्रार्दुभाव वाढेल. एकंदरितच आता येत्या ४ मेला जर लॉकडाऊन उठवला तर येणाऱ्या पुढच्या परिस्थितीचं नियोजन करावा लागेल, अन्यथा लॉकडाऊन तसाच ठेवावा लागेल.

Full View

 

Similar News