लॉकडाऊननंतरचं अर्थव्यवस्थापन कसं करणार?

Update: 2020-05-01 10:56 GMT

३ मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार आहे आणि ४ मे पासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होईल. या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलेला आहे. पण कोरोनाच्या संकटाआधीच अर्थव्यवस्था उध्वस्त झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या या संकटामुळे मोदी खूश झाले असणार कारण त्यांना आता अर्थव्यवस्थेच्या अधोगतीचं खापर कोरोनावर फोडता येणार आहे.

हे ही वाचा...


कोरोना लोकशाहीवरील हल्ला – कुमार केतकर

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ‘केरळ पॅटर्न’ – कुमार केतकर

कोरोनाचे संकट: देशात आरोग्यासह पैशाचा हाहा:कार कुमार केतकर

पण मोदींनी या संकटातून बाहेर येण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत कारण मोदींच्या भाषणांमध्ये अर्थव्यवस्थेचा उल्लेख नाहीये. केंद्राचा महसूल वाढावा यासाठी सूचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे. याचा अर्थ सरकारला कुणाचाही सल्ला चालत नाही. बड्या उद्योगपतींचे ६८ हजार कोटींचे कर्ज राईट ऑफ केले गेले. पण कोरोनाच्या संकटासाठी पुरेशी तजवीज होत नाहीये.

सरकारने अनावश्यक खर्च वाचवला तरी मोठा निधी उलब्ध होईल. दिल्लीत नवीन दिल्लीच्या उभारणीसाठी २० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत, हा खर्च तिकडे न करता कोरोनाविरोधात वापरता येईल. बुलेट ट्रेनचा खर्च वाचवून कोरोनाच्या संकटावर खर्च केला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जाहिरातबाजीवरील खर्च सरकारने बंद करावा.

लॉकडाऊनचे साइड इफेक्ट्स

कोरोनाचा शिरकाव होऊ न देणाऱ्या देशांकडून शिकण्याची गरज- कुमार केतकर

पर्यावरण आणि करोनाचा शाप - कुमार केतकर

ICMR चा इशारा, सरकार गांभीर्याने घेईल का? : कुमार केतकर

PM CARE फंडातून बेहिशेबी पैसा गोळा होणार आहे कारण या फंडाचा हिशेब मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाऊननंतरचं अर्थव्यवस्थापन कसं करता येईल याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

Full View

Similar News