कर्जात बुडालेले अनिल अंबानी राफेलचं विमान उडवू शकतील का?

Update: 2020-08-05 04:24 GMT

रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या कंपनीनं 12 हजार कोटीची कर्जाची रक्कम न भरल्यानं ‘येस बँके’नं त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं आहे. तसंच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, हे सर्व होत असताना अनिल अंबानी यांच्यासाठी ही स्थिती कही खुशी कही गम अशी काहीशी आहे.

कारण राफेल विमान भारतात आलं आहे. राफेल मुळं भारतीय सैनिकांची ताकद निश्चित वाढली आहे. मात्र, राफेल आल्यानं अनिल अंबानी यांच्यासाठी चांगले दिवस कसे आले? हा प्रश्न तुम्हाला निश्चित पडला असेल. त्यासाठी तुम्हाला थोडसं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. लोकसभा निवडणूक आठवा... राफेल हा निवडणूकीचा मुद्दा का बनला होता? होय तेच कारण आहे.

राफ़ेल तयार करणाऱ्या डसॉ एविएशन या कंपनीने अनिल अंबानी यांच्या रिलायंस एयरोस्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला ऑफ़सेट पार्टनर बनवलं होतं. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस ने हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड हा भारत सरकारची स्वत: ची कंपनी असताना भारत सरकारने दिवाळखोरीत निघालेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला 30,000 कोटीचं Contract कसं मिळालं? असा सवाल उपस्थित केला होता.

मात्र, आता हा प्रश्न त्याच्याही पुढे जाऊन पोहोचला आहे. कारण आर्थिक अडचणीत सापडलेले अनिल अंबानी राफेल चा हा करार कसा पूर्ण करणार? पाहा बॅकींग तज्ञ विश्वास उटगी यांचं विश्लेषण...

Similar News