बोगस बियाण्यांवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रया...

Update: 2020-06-28 08:42 GMT

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (28 जून ला 2020) ला फेसबूक लाईव्ह द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी 30 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन पुढेही असाच सुरु राहील याची माहिती दिली. तसंच यावेळी राज्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

बोगस बियाण्यांच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आलं आहे. मात्र, शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून देणार, आरोपींना शिक्षा करणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?

शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी आहे. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.

Full View

Similar News