अजितदादामुळं आपलं सरकार, त्यांना परत घ्या - छगन भुजबळ

Update: 2019-11-26 16:33 GMT

आज उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचं नेतृत्व स्विकारण्याची विनंती करून त्यांचं नाव जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सूचित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार या ठिकाणी नव्हते. पक्ष स्थापनेपासून अजित पवार हे पक्षामध्ये आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या मनात अजित पवार नसल्यानं एक खंत होती. ही खंत छगन भूजबळ यांनी बोलून दाखवली.

हे ही वाचा

उद्धव ठाकरेंचा पत्ता बदलणार

पत्रकारांवर हल्ला कराल तर सावधान! तीन वर्षासाठी खावी लागणार जेलची हवा…

अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

झालं गेलं विसरुन जाऊन अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आणा, अशी मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

' सुबह का भुला शाम को घर आ जायें तो उसे भुला नहीं कहते' अजितदादांनी राष्ट्रवादीसाठी मोलाचं काम केलं आहे. त्यांनी भाजपसोबत जाऊन बंडखोरी जरी केली असली तरी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार कोसळलं आहे, त्यामुळे आपल्याला संधी मिळाली, अशी आठवणही भुजबळांनी करून दिली आहे.

दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी शिवतिर्थावर होईल. असं सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल. आज या घडीला बाळासाहेब ठाकरे असायला हवं होते. असं म्हणत बाळासाहेबांची आठवण काढली.Full View

Similar News