#ArmySeMaafiMaangoModi : मोदीजी देशातील सैनिकांची माफी मागावी - राहुल गांधी

Update: 2019-05-04 06:30 GMT

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित करत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत यादीच जाहीर केली. एवढंच नाही तर ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाले. त्याच्या तारखाही जाहीर केल्या. त्यावर मोदींनी काँग्रेसवर पलटवार करत काँग्रसची कारवाई ही कागदावरच होती. व्हीडीओ गेम खेळण्यातलं युद्ध आणि प्रत्यक्ष केली जाणारी कारवाई यातला फरकच काँग्रेसला माहित नाही. कचखाऊ धोरण असणारी काँग्रेस काय धाडस दाखविणार असा सवाल मोदींनी उपस्थित केल्यानंतर स्वत: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर सडकून टीका केली.

देशातील आर्मी ही मोदी यांची खासगी मालमत्ता नाही. सर्जिकल स्ट्राईक हा देशातील सैनिकांनी केले आहे. कॉंग्रेसच्या काळातील सर्जिकल स्ट्राईक व्हीडीओ गेम खेळण्यातलं युद्ध असल्याचं म्हणत मोदींनी कॉंग्रेसचा अपमान केला नाही तर देशातील सैनिकांचा अपमान केला असल्याची टीका करत राहुल गांधी यांनी केला आहे.

त्यानंतर कॉंग्रेसने आता सोशल मीडियावर आर्मी से माफी मांगो #ArmySeMaafiMaangoModi हा नवीन हॅश टॅग ट्रेन्ड केला आहे.

Full View

Similar News