काही वेळातच मतमोजणीला सुरूवात होणार आहे. देशातील मतदान झालेल्या 542 मतदारसंघात कोण खासदार होणार याचबरोबर देशाची धुरा कोणाच्या हाती जाणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
जवळपास सर्वच एक्झिट पोलनी एनडीए चं म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. शेअर बाजारातली अभूतपूर्व उसळी आणि काही तज्ज्ञांनी मात्र एक्झिट पोलशी तितकीशी सहमती दर्शवलेली नाहीय, तरी सुद्धा मोदीच पंतप्रधान बनतील अशी शक्यता सर्वांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्या आघाडीचं सरकार बनण्याची शक्यता कुणालाच वाटत नसली तरी भारतीय जनता पक्ष 180-200 जागांच्या आसपास राहिला तर मोदी व्यतिरिक्त कुणीही पंतप्रधान बनावं यासाठी मोर्चेबांधणी होऊ शकते. एकूणच, मतमोजणीला विलंब होणार असल्याने 23 मे चा दिवस रंगतदार आणि टेन्शन वाढवणारा ठरणार आहे.
तुमचा पोल काय..
प्रत्यक्ष मतमोजणी आधी तुम्हीही तुमचे अंदाज व्यक्त करा, #MaxElection हा हॅशटॅग वापरून तुम्हीही तुमचे अंदाज सोशल मिडीयावर पोस्ट करा. पाहुयात कुणाचे अंदाज खरे ठरतायत ते.
https://youtu.be/KMqj5yRqGDA