लोकांना शांततेत जगू द्या! अयोध्येत पूजेची संमती मागणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Update: 2019-04-12 10:58 GMT

अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर पूजा करण्याची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांनी आज परवानगी नाकारली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमी भागात पूजा करण्यास संमती मिळावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या जागेवर पूजा करण्याची संमती मागणाऱ्यांनी देशाला शांततेत जगू द्यावं अशा शब्दात फटकारत सुप्रीम कोर्टाने पूजेची संमती मागणारी याचिका फेटाळली आहे. तुम्हाला देशात शांतता राखायची नाही का? असा प्रश्न विचारत मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्यांना संमती नाकारली आहे.

या अगोदरही याचिकाकर्त्यांनी पूजा करण्यासाठी खालच्या न्यायालयात परवानगी मागितली होती. मात्र, खालच्या न्यायालयाने ही परवानगी नाकारल्यानं याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत तुम्हाला या देशात शांतता नको आहे का? असा सवाल करत ही याचिका फेटाळली आहे.

रामजन्मभूमी – बाबरी मशीद जमीनीचे प्रकरण न्यायालयात असून या संदर्भात 8 मार्चला झालेल्या सुनावणीत हे प्रकरण मध्यस्थीसाठी तीन सदस्यीय समितीकडे देण्यात आले आहे. या समितीत न्या.एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. या संदर्भात आठ आठवड्यात समितीनी आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Similar News