विधीमंडळाचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच अधिकृतरित्या काँग्रेसचा राजीनामा देवून भाजपाच्या तंबुत शिरणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. आधीच गर्भगळीत झालेल्या कॉंग्रेसला विखे पाटील जाताना खिंडार पाडतील अशी चर्चा आहे. ते आपल्यासोबत कॉंग्रेसचे काही आमदार फोडून नेतील, असं मानलं जातयं.
काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकतीच विखे-पाटील यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केल्याचे समजतं. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचम अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट करीत आपणही भाजपाच जाणार असल्याचे संकेत दिलेयत. राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपकडून मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता असल्यानं ते आपल्या सोबत आणखी काही आमदार घेऊन जातील, असं सांगितलं जातंय,
डॉ. सुजय विखे-पाटील यांनी लोकसभेत भाजपाच्या तिकिटावर विजय मिळवल्यानंतर तंसच त्यांचा प्रचार राधाकृष्ण विखे यांनी केल्यानं त्यांना कॉंग्रेसमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही. य़ा पार्श्वभूमीवर ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असून त्यांना विखे-पाटील मंत्रिमंडळात सामावलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे आणखी काही आमदार कॉंग्रेसला सोडचिठ्टी देत भाजपात गेल्यास आधीच कमकुवत झालेल्या कॉंग्रेसला खिंडार पडेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.