हा लोकशाहीचा नव्हे तर मोदी-शहांच्या इंजिनिअरींग आणि केमिस्ट्रीचा विजय – नाना पटोले
मागील पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्याचबरोबर आर्थिक दुर्बलांच्या योजना बंद होऊन जाती-धर्मांवर आघात झाले आहेत. तरीही लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला कधी नव्हे तेवढे मताधिक्य मिळणं हे आश्चर्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिलीय. हा विजय लोकशाही नसून अमित शाह आणि मोदींच्या इंजिनिअरिंग आणि केमिस्ट्रीचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिलीय.