'ते' विधान मोदींना भोवलं....निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

Update: 2019-04-10 04:54 GMT

'पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की, तुमचं पहिलं मत हे बालाकोट येथे हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का?'

असं म्हणत मोदींनी लातूरमधील औसा येथील जाहीर सभेत पहिल्यांदा मतदार करणाऱ्या तरुणांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केले होतं. मोदींच्या या विधानानंतर विरोधकांनी मोदींवर टीका केली असून राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान मत मागत असल्याचा आरोप केला आहे. मोदींनी केलेल्या या विधानावर निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे रिपोर्ट मागितला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केलं का? असा सवाल निर्माण झाला आहे.

या संदर्भात राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकडे सर्वांच लक्ष लागलं असून या संदर्भात निवडणूक आय़ोग काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं आहे.

Similar News