राफेल प्रकरणी मोदी सरकारला मोठा झटका

Update: 2019-04-10 06:26 GMT

राफेल प्रकरणा संदर्भात विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर या प्रकरणा संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता राफेल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं म्हटल्यानं मोदी सरकारला ऐन निवडणूकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1115844023808417792

याप्रकरणामध्ये पुराव्यांचा कागदपत्रांवर घेतलेला आक्षेप हा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं कागदपत्रांवरील आक्षेप मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे निवडणूकीच्या या रणधुमाळीत मोदी सरकारला मोठा फटका फसल्याचं बोललं जात आहे.

अरूण शौरी यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली असून या प्रकरणा संदर्भात बोलताना ते म्हणाले

" तीन न्यायाधिशांच्या पिठानं एकमुखानं हा निर्णय दिला आहे. कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्र चोरीची आहे हा सरकारचा युक्तीवाद कोर्टानं फेटाळून लावला आहे."

 

* समजून घ्या राफेल प्रकरण :

1 .Rafale Deal: असा झाला राफेल घोटाळा?

2. ‘हे’ आहे राफेल कराराचे पूर्ण सत्य

3. राफेलकराराबाबत कॅगमधील दहा महत्त्वपूर्ण मुद्दे

4.राफेल करारावरची सर्वांत मोठी बातमी

5. Rafale Deal : अशी झाली ऱाफेल प्रकऱणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी

 

 

Similar News