नातू पडला.... भूत दिसलं

Update: 2019-05-23 14:36 GMT

महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी असलेली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं म्हणजेच शरद पवार कुटूंबियांनी प्रतिष्ठेची केलेली मावळ मतदार संघातील निवडणूक. या ठिकाणी राष्ट्रवादीच्यावतीनं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात पार्थ पवार निवडून येतील, अशी अटकळ बांधली जात होती. कारण शेकाप आणि कॉंग्रेस यांची मदत होईल, अशी अपेक्षा पवार कुटूंबियांना होती. मात्र तसे होताना दिसले नाही आणि पार्थ पवार यांना सुमारे दिड लाख मतांच्या फऱकानं पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, शऱद पवार हे सातत्यानं ईव्हीएम मशीनच्या विरोधात भूमिका घेत या ईव्हीएमवरच आक्षेप घेतला.

बारामती मतदारसंघात जर पराभव झाला तर जनतेचा लोकशाहीवरून विश्वास उडेल असं उद्विग्न वक्तव्यही त्यानी केलं होतं. बारामतीचा गड राखता आला असला तरी पवार कुटूंबियांना मावळची जागा जिंकता आली नाही. त्यामुळं या जागी पार्थच्या रूपानं नातू पडल्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त करीत ईव्हीएम यंत्राबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत असल्याचं वक्तव्य करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे पराभवाबाबतही शंका व्यक्त केलीय.

Similar News