EVM बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Update: 2019-05-07 06:25 GMT

गेल्या काही दिवसांपासून EVM आणि व्हिव्हिपॅट संदर्भात विरोधकांसह सर्वसामान्य नागरिक देखील शंका उपस्थित करत आहे. त्यातच विरोधकांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज धाव घेत व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएमची एकत्रित मोजणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.

EVM मध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भाजपला होत असून 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे.

काय होती विरोधकांची मागणी?

EVM आणि व्हिव्हिपॅट संदर्भात कॉंग्रेससह 21 विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

दरम्यान, विरोधकांची ही मागणी मान्य केली असती तर लोकसभा निवडणुकीचे निकाल 2 ते 3 दिवस उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण, 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्यासाठी वेळ लागला असता.

Similar News