स्मृती इराणी या पदवीधर नव्हे १२ वी पास

Update: 2019-04-12 11:34 GMT

केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणींच्या शिक्षणाविषयी गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. आपण पदवीधर नसल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केलंय. दिल्ली विद्यापीठातून पदवी संपादित केली नसल्याचं त्यांनी आयोगाला सांगितलं.

स्मृती या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी १९९१ मध्ये इयत्ता दहावीची तर १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली केल्याचं शपथपत्रात नमूद केलंय. स्मृती यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्यावेळी सादर केलेल्या शपथपत्रात स्मृती इराणींनी दिल्ली विद्यापीठातून १९९४ मध्ये वाणिज्य शाखेची पदवी संपादित केल्याचा उल्लेख केला होता. त्याचवेळी विरोधकांनी त्यांच्या पदवीवर आक्षेप घेतला होता..

Similar News