'वाघ' भाजपवर नाराज

Update: 2019-04-04 10:30 GMT

शालेय तसंच महाविदायलयीन जीवनापासून रक्ताचं पाणी करत ज्या पक्षासाठी काम केलं. त्याच पक्षाने आपली उमेदवारी असताना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हालचाली सुरू केल्या. यामुळे महिला कार्यकर्त्यांचा हा अपमान असून मोठा जनप्रक्षोभक असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार स्मिता वाघ यांनी दिलीय. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र पक्षाने चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यास सांगितल्याने स्मिता वाघ नाराज झाल्या आहेत. तीस वर्षे आपण पक्षासाठी काम केलं. मात्र, चार वर्षांपासून भाजपात असलेल्या आमदाराला पक्षाने कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले? त्याचबरोबर आपलं तिकीट का कापलं जातंय याचा जाब वरिष्ठ नेत्यांना विचारणार असल्याचं स्मिता वाघ म्हणाल्या. दरम्यान, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पक्षाचे काम करत राहणार असल्याचं स्मिता वाघ यांनी यावेळी सांगितलं आहे.

Full View

 

Similar News