राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले, ३ महिन्यांत ३,४३४ बळी

Update: 2019-05-09 06:49 GMT

सरकार रस्ते अपघात थांबवण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसते. मात्र, सरकाराला या उपक्रमात यश मिळताना दिसत नाही. सर्व साधारणपणे पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडून अपघाताचे प्रमाण वाढताना दिसते. मात्र, राज्यात जानेवारी ते मार्च दरम्यान तब्बल 9 हजार 96 रस्ते अपघात झाले असून या अपघातात 3 हजार 434 लोकांचा जीव गेल्यानं रस्त्यावरील अपघात पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरला आहे.

कुठे किती अपघात?

मुंबईत ७८२ अपघातात ९९ जणांचा मृत्यू झाला असून पुणे शहरात २२४ अपघातांत ५९ लोकांचा जीव गेला आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यानच्या कालावधीसाठी परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा कक्षाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण ४९ टक्क्यांनी तर ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी झाले आहे. ठाणे जिल्यातही अपघातांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर...

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अपघातांची संख्या सर्वांत जास्त म्हणजेच ९१ टक्के आहे. औरंगाबादमध्ये ८३ टक्के, लातूरमध्ये ६२ टक्के तर विदर्भातील भंडाऱा जिल्ह्यात ५८ टक्के अपघातांचे प्रमाण आहे.

मुंबई-पुणे शहरातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संख्येच्या तुलनेत घट झाली असून सातारा, औरंगाबाद, भंडारा. लातूरमध्ये मात्र, या संख्येत वाढ झाली आहे.

Similar News