महाराष्ट्रातील १७ जागांसह ७१ मतदारसंघामध्ये मतदान

Update: 2019-04-29 05:59 GMT

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज सोमवारी मतदान होत असून एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये नऊ राज्यातील ७१ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

राज्यातील या अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघात ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामध्ये सर्व जागा सध्या युतीकडे असून त्या जिकंण्याचे लक्ष युतीपुढे आहे.

महाराष्ट्रातील 15 विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, हिना गावित आणि हेमंत गोडसे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

Similar News