नरेंद्र मोदी यांना भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सभागृहाचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि नितिन गडकरी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर एनडीएचे नेते म्हणून प्रकाश सिंह बादल यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याला नितिश कुमार आणि उद्धव ठाकरे यांनी अनुमोदन दिले.
एनडीए या बैठकीत भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, अकाली दल के प्रकाश सिंह बादल, शिवसेना चीफ उद्धव ठाकरे, बिहार सीएम नीतीश कुमार, एलजेपी के रामविलास पासवान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि नवनिर्वाचित खासदार उपस्थित आहेत.
या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना औपचारिकरित्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात येणार आहे. संसदीय दलाच्या नेता निवडीनंतर राष्ट्रपतींना 17व्या लोकसभेतील खासदारांची यादी देवून नविन सरकार स्थापण्याचा दावा करण्यात येणार आहे. या महिन्याच्या शेवटी नव्या मंत्रिमंडळासह प्रधानमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.