मोदी विरोधकांचं पतन

Update: 2019-05-23 14:21 GMT

राज्यासह देशात भाजपानं जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा सत्तेचा सोपान गाठला आहे. मात्र, या निवडणूकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडाडून विरोद करणा-यांचं पतन झालं. त्यांना दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. यात राज्यात जर पाहिलं तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आणि भाजपाचे माजी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधांनांच्या कामाच्या पद्धतीवर जोरदार आक्षेप घेत राजीनामा दिला आणि सातत्यानं टीकेचं लक्ष्य केलं होतं. त्यांना नितीन गडकरी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्याच प्रमाणं कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी तसेच संसदेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांना पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनाही अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांच्याकडून दारूण पराभव स्विकारावा लागला. तसंच मोदी यांना सातत्यानं लक्ष्य करणा-या भाजपाचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा याना पाटणासाहिब मध्ये हार पत्करावी लागली. तर डाव्या विचारांचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनाही बेगुसराय मतदारसंघात गिरीराज सिंह यांनी धुळ चारलीय. एकुणच ज्यांनी ज्यांनी मोदी यांना थेट आव्हान दिलं होतं त्यांच्यावर टीका करीत प्रचाराची राळ उडवली होती त्यांना जनतेच्या रोषालाही सामोरं जावं लागल्य़ानं पराभव पत्कारावा लागलाय.

Similar News