मोदी सरकारला दूरदर्शनवर जास्त प्रसिद्धी का ?

Update: 2019-04-06 07:22 GMT

सरकारच्या अधिपत्याखालील डीडीन्यूजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सर्वाधिक प्रसिद्धी देण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केल्यानंतर निवडणूक आयोगानं डीडी न्यूजकडून प्रसिद्धीसंदर्भातला अहवाल मागवलाय.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध कार्यक्रमांचं, मोदींच्या सभांचं लाईव्ह कव्हेरज हे प्राधान्यानं दाखवण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. यासंदर्भात राष्ट्रीय न्यूज ब्रॉडकास्टर्सनं यासंदर्भात निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानं डीडी न्यूजनं सर्वच राजकीय पक्षांना दिलेल्या प्रसिद्धीसंदर्भात अहवाल मागवला आहे.

डीडी न्यूजने ३१ मार्च २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मै भी चौकीदार’ हा कार्यक्रम सलग एक तास प्रसारित केल्याबद्दलही निवडणूक आयोगानं डीडीन्यूज कडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Similar News