मराठा समाजाला वैद्यकीय शिक्षणात आरक्षण देता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

Update: 2019-05-30 06:56 GMT

काही दिवसांपुर्वी मराठा समाजातील वैद्यकीयय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 16 टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीसाठी जागा मिळाव्यात या करिता आंदोलन सुरू होते. यावर तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होत. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात माराठा समाजाला वैद्यकीय आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळं हा राज्य सरकारला खुप मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. तर आरक्षण देण्याआधी सरकारने मेडिकलच्या जागा वाढवाव्यात असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे.

Similar News