खरगेंच्या ‘त्या' वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आक्रमक

Update: 2019-05-14 05:13 GMT

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. सातव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय नेते एकमेकांवर वादग्रस्त टीका, चिखलफेक करत आहेत. प्रचारादरम्यान काँग्रसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ४० पेक्षा जास्त जागा जिंकल्यांवर मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेणार का? असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाला यंदाच्या निवडणुकीत ४० जागाही जिंकता येणार नाही. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा दावा खोटा ठरल्यास मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेणार का? असे खरगे यांनी कर्नाटकमधील प्रचारसभेत केले आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. यावेळी काँग्रेस नेते खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. रविवारी कर्नाटकमधील चिंचोली विधानसभामधील काँग्रेसचे उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत खरगे बोलत होते. ते म्हणाले की, ‘येथे उपस्थित असणारे सर्व मतदार भविष्य लिहणार आहेत. सुभाष आणि काँग्रेसचे भविष्य मोदी अथवा भाजपाच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे.’

काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,

‘मोदी प्रचारासाठी जेथे जातात तेथे असे म्हणतात की, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४० जागाही जिंकता येणार नाहीत, जर आम्हाला (काँग्रेस) ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेतील का? ‘ असे म्हणत खरगे यांची जिभ घसरली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागा मिऴवले होते.

भाजपा खासदार शोभा करंदलाजे यांनी खरगे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचे अवाहन केले आहे. ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्याला असे वादग्रस्त वक्तव्य करणे शोभते का ? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

Similar News