विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी वर्षा गायकवाड?

Update: 2019-05-20 05:17 GMT

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेते पदी कॉंग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार याचा फैसला आज होणार आहे. या संदर्भात कॉंग्रेस आमदारांची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख, आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे वाढते समर्थन पाहता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार समोर ठेवून वर्षा गायकवाड यांना दलित समाजाचं नेतृत्व म्हणुन पुढं आणण्याची कॉंग्रेसची रणनीती आहे.

तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेसला विदर्भ आणि मराठवाडा महत्त्वाचा असल्याने विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख यांचे नाव चर्चेत आहे.

Similar News