आज 13 एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झाले. 13 एप्रिल, १९१९ ला इंग्रजांचा क्रुर अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी निशस्त्र लोकांवर १,६०० फैरी झाडल्या होत्या. शहरात लष्करी कायद्याचा अंमल होता, जमावबंदीचा हुकूम काढण्यात आला होता. तरीही लोक त्या सभेसाठी एकत्र जमले. योगायोगाने त्या दिवशी बैसाखीचा सण होता. त्यावेळी जनरल डायर या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला होता. या घटनेला शंभर पूर्ण झाली म्हणून या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
याचबरोबर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील अमृतसमध्ये जाऊन सकाळी आठ वाजता शहीदांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शहिदांची आठवण म्हणून नाणे आणि पोस्ट जारी करण्यात येणार आहे.